TESTIMONIALS

KBBF म्हणजेच कऱ्हाडे ब्राम्हीण बेनेव्होलांट फौंडेशन देशभरातील तसेच जगभरातील प्रस्थापित आणि प्रतिष्ठित व्यवसायांच्या मालकांची संघटना आहे. जे प्रत्येक व्यापार आणि व्यवसायाचे प्रतिनिधित्व करते आणि उच्च तज्ञ क्षेत्रातील व्यवसायांचे विस्तारित नेटवर्क जोडते. KBBF हा एक असा प्रोत्साहक आणि नेटवर्किंग गट आहे जो नवीन व्यवसायिकांसाठी एका व्यासपीठासारखेच काम करतो. KBBF कायमच आपल्या नवीन सदस्यांना त्यांच्या व्यवसायासंबंधित नवीन कल्पना, व्यवसायिक ज्ञान आणि व्यवसायाच्या दृष्टीने लागणारे मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्नशील असते. KBBF हा मंच एकाच क्षेत्रामध्ये असणाऱ्या व्यावसायिकांना वेबसाईटद्वारे व्यवसायाच्या वाढीसाठी विविध सुविधा प्रदान करून देतो जसे की व्यवसाय निधी फंड, व्यवसाय वाढ, अंतर्गत लेखापरीक्षण. तसेच आपल्या व्यवसायात येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी अगदी माफक दरात योग्य सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध करून देते आणि विशेष म्हणजे अशा या मंचावर आपल्या व्यावसायिक अडचणीवर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी KBBF चे वरिष्ठ व अनुभवी सदस्य नेहमीच उपलब्ध असतात. महत्वाचे म्हणजे ही फक्त व्यवसायिक मार्गदर्शन करणारी केवळ एक संघटना नसुन मानसिक दृष्ट्या आधार देणारा एक आधारस्तंभ आणि एकमेकांच्या अडीअडचणीच्या वेळी कायम पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे असे एक कुटुंबच आहे जे आपल्या सर्व सदस्यांना नेहमीच एकत्र बांधून ठेवत आलेले आहे. अशा या एकत्र कुटुंबाच्या संघटनेच्या कार्यक्रमांचा व सभांचा भाग होण्यास मी नेहमीच उत्सुक असतो. नुकत्याच KBBF द्वारे आयोजित केल्या गेलेल्या एका कार्यक्रमाचा भाग होण्याचे भाग्य मला लाभले. एका पंचतारांकित हॉटेल मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावरून KBBF च्या संघटनेची भव्यता जाणवली. एक उच्च विचारसरणी, उच्च दृष्टी आणि उच्च ध्येय प्राप्त करण्याची क्षमता अंगी बाळगली तर आपणसुद्धा आपल्या व्यवसायामध्ये उच्च पातळी आणि सर्वोत्तम श्रेणी प्राप्त करू शकतो हे मला या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यावर प्रखरपणे जाणवले.

KBBF चे सर्वात महत्वाचे म्हणणे हेच आहे की योग्य प्रकारे कामाची आखणी, कामाचा उत्तम दर्जा, पारदर्शकता, नैतिक मुल्ये जपण्याची दृष्टी, कायदा आणि अटींच्या मर्यादेत राहून कामे करणे आणि ग्राहकाला कायमच उत्तम आणि समाधानकारक सुविधा आणि सेवा देणे हे प्रत्येक सभासदाचे पहिले कर्तव्य आणि हीच जबाबदारी आहे. जेणेकरून इतर सभासदांचा संदर्भ देताना आपल्याला त्यांच्याविषयी आणि दिलेले कार्य योग्य प्रकारे तडीस न्यायच्या उत्तम प्रक्रियेविषयी ठाम विश्वास असला पाहिजे.

बांधकाम क्षेत्र हे या काळातील अत्यंत महत्वाचे असे क्षेत्र जिथे रोज नवनवीन संकल्पना उदयास येतात. अमेरिकन लेखक नॉर्मन व्हिन्सेंट पीले यांच्या “ If you think you can’’ या पुस्तकावरून प्रेरित होऊन अत्यंत आव्हानात्मक अश्या समजल्या जाणाऱ्या या बांधकाम क्षेत्रामध्ये आपले पाऊल घट्ट रोवायचे हे एकच स्वप्न उराशी बाळगून मी २००५ साली सांगली वरून पुण्याला आलो. नवीन शहर, नवीन लोक यामुळे सुरुवातीला व्यवसाय करण्यास थोडा संघर्ष करावा लागला. परंतु नंतर जस जश्या ओळखी वाढू लागल्या आणि सार्वजनिक संपर्क वाढू लागले तस तसा माझा व्यवसाय सुद्धा वाढू लागला. यामध्ये KBBF चा सुद्धा तितकाच महत्वाचा वाटा आहे कारण त्यामुळे माझी अजून नवीन व्यवसायिकांची ओळख झाली आणि व्यवसायात जम बसवणे सोपे गेले. गेली अनेक वर्षे आम्ही म्हणजेच कोटीभास्कर ग्रुपने या क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत राहून स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. ग्राहक हा मुख्य दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन आमच्या सर्व प्रकल्पांमध्ये आधुनिक सुविधा देण्याकडे आमचा कल असतो त्यामुळेच आमचा प्रत्येक प्रकल्प आमच्या प्रत्येक ग्राहकाच्या पसंतीस उतरला आहे. सध्या बांधकाम क्षेत्रात आत्ताचे वाढत शहर,वाढती लोकसंख्या हे सर्व लक्षात घेता काळाची गरज म्हणून “इमारतीचे पुनर्विकसन’’ ह्या संकल्पनेने जोर धरला आहे आणि या मध्ये सुद्धा आम्ही आमचे पाय भक्कम रोवले आहेत. आमचे अनेक पुनर्विकसनाचे प्रकल्प ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. पुनर्विकसनात जुन्या बांधकामाबद्दल लोकांचे असलेले प्रेम, आस्था, भावना लक्षात घेऊनच आम्ही पुनर्विकसन करतो. आम्ही आत्तापर्यंत आमची सर्वच कामे नेहमीच कायद्याच्या चौकटीमध्ये राहून योग्य प्रणालीनुसार आणि वेळेवर पूर्णत्वास नेली आहेत आणि यापुढेही नेत राहू, त्यामुळेच तर आमच्या नवीन येणाऱ्या प्रकल्पांची बांधकाम क्षेत्रात नेहमीच चर्चा असते.

आमचे आतापर्यंत पुण्याच्या अत्यंत प्रमुख अशा ओळखल्या जाणाऱ्या कोथरूड, कर्वेनगर आणि प्रभात रोड येथे अनेक प्रकल्प सुरु आहेत आणि पुण्यासोबतच आमचे सांगली येथे देखील अनेक उत्तम प्रकल्प सुरु होत आहेत आणि आम्ही हे सर्व प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास नेऊ. आणि नेहमी प्रमाणेच हे सर्व प्रकल्प ग्राहकांच्या पसंतीस उतरतील या वर माझा ठाम विश्वास आहे. कारण दिलेल्या वेळेत सर्व कामे पूर्ण करून घराचा ताबा देणे, प्रत्येक प्रकल्प आधुनिक सोयींनीयुक्त, सर्वात महत्वाचे म्हणजे बांधकामाचा उत्तम दर्जा आणि श्रेणीत सर्वोत्तम या वैशिष्टयांच्या या जोरावर आम्ही आतापर्यंत आमच्या सर्व प्रकल्पांची निर्मिती केली आहे. आणि आमच्या सर्व ग्राहकांच्या मनात एक अढळ विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. म्हणूनच आम्ही म्हणजेच कोटिभास्कर ग्रुप कायम अभिमानाने म्हणतो की, "आम्ही मनात घर करतो."!!